
मेल्यानंतर. .....................🌹🌹🌹
मेल्यानंतर........
तुमच्या निष्प्राण.....कफन ओढलेल्या शरीराभोवती.......माणसं गोळा झालेली असतात .....तुमचीच....शेवटचं भेटायला आलेली....
..रडत असलेली. ......रडगाणीही गातात .....जीव लावणारी माणसं. .......
काहीजण तर बेशुद्ध होतात धक्क्यानं......
तुमचं जिवंत असताना जे कौतुक झालं नाही त्याच्या
दुप्पट स्तुती केली जाते तुमची.....तुम्ही नसताना.....
मेल्यानंतर.........
तुमच्या एखाद्या सुंदर फोटोला ........बिनवासाच्या फुलांचा हार लावला जातो.........न कोमेजणारा....
काही दिवसात.....आठवडे.....महिने... जाऊन..तो फोटो ......
भिंतीवर जातो .....मग घरातलेही हळूहळू विसरून जातात......
काही वर्षांत तो फोटो माळ्यावर टाकला जातो....
तो माणूस शरीरानच नाही तर मनानेही निघून जातो..... ........
त्याने त्रास दिलेली माणसंही चांगलं बोलून जातात.....
मेल्यानंतर. .....
फक्त आठवणी उरतात.... मनात खोलवर...कुठेतरी. .............
असा होता.....हे बोलायचा.......ते करायचं होतं. त्याला......फार स्वप्न होती........का गेला ....
हे अस बोलून उपयोग काय?
माणूस तर गेला......चांगली कामं,पैसा,तथाकथित संपत्ती सोडून..........
राहिलं ते वागणं. ....त्याला सणजून घेणं. .......
एरव्ही त्यालाच तुम्ही मूर्ख सममजत होतात...कधी त्याच्याशी जीवघेणच वागायचात.........
आत्ता आत्म्याला शांती वगैरे असे शब्द नका बोलू.....
जिवंत असताना माणसांच्या भावना दुखवायच्या
नांव ठेवायची.........कधी कुरघोड्या..चढाओढ...तर कधी. .......माणूस म्हणून वागणूकच न देणं.......
ह्या सगळ्यात आपण मग्न असतो........
मग मेल्यानंतर दुःख का?
कारण जिवंत असतांना, किंमतही केली जात नाही!....हेच दुर्दैव. .....
कि एखाद्या माणसाला माणूस म्हणून महत्वच देउ नये. .........
नसतात सात जन्म. ......एकच जन्म नीट जगूया ...
जगवूया की माणूस होऊन. .....!
जरा आपण जिवंत आहोत तर का आपण आपल्या माणसांच्या भावना समजून घेउ नयेत?
त्याचं महत्त्व का जाणवू नये?..विचारूया जरा स्वतःच स्वतःला..........
तरच बहुतेक मेल्यानंतरच दुःख वाटणार नाही...
उलट शरीर जाणारच आहे कि मन घेऊन. ......
पण त्याला जिवंत असतांनाच आपण आनंद देउ शकतो ,आपल्या वागण्यातून. ......सतत......
अनोखा........
हेच तर कळायला हवं......जिवंत असतांना. ...
.........प्रत्येक सेकंद. .....तेही नव्याने. ...
कारण शेवटी राखच होणार........ आहे.........कोणाचीही. ......कधीतरी.........
मग तेव्हा निशब्द. ......बघत असू आपण ..........त्या मातीकडे ..........काहीतरी राहून गेल्यासारखं. ......
-कुणाल विजय ठाकरे.
.
.
..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा