मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

दिशाहीन मन........😍💛💚

दिशाहीन मन....💙 💙💙 चाललय कुठेतरी...बेभान होऊन. ....... वेगळ्याच दिशेला. ....निशब्द. ...चालत. .. वाट दिसेल तिकडे....... नाही माहिती काय होईल... कसं होईल. .....काय करावं....कुठे जावं... तरीही जायचं आहे एवढंच फक्त माहीती आहे.... अल्लड वाटतं बघितल्यावर. .. विचार आहेत प्रचंड भांबावलेले ... सतत काहीतरी सुचतय पण मार्ग मात्र अजूनही  सापडत नाही... एकाच ठिकाणी कधीकधी उभं राहतं तासनतास. .. पण मग पुन्हा काहीतरी विलक्षण शोधत बाहेर पडतं. सर्व काही आहे जवळ पण स्थिरताच नाही त्याला.  आनंद वाटतोय सहज मनमौजी वागायला.... जे काही करायच ते आत्ताच असंही वाटतय. सैरभैर होणं थोडं बदलावं हेही जाणवतय. . स्वतःला शोधण्यासाठी मन आसुसलय. . आत्ता भरकटलेपणालाही कुठेतरी काहीतरी अस्वस्थ  वाटतय.. पण वेळ मात्र थांबत नाही ... हे ही त्याला आत्ता कळून चुकलय. हळूहळू का होईना पण ध्येयाचं महत्त्व पटलय.. आत्ता खरं कुठेतरी दिशा सापडली असं वाटतय. चालायला खूपच आहे. माहिती आहे.पण आनंद आहे याचा कि दिशा मिळाली जगण्याला आत्ता मन नव्याने जगायला तयार आहे... कारण आत्ता आयुष्य आपोआपच सुंदर होणार आहे हो मनाला दिशा सापडली आहे...

वारकरी. ................विठ्ठलाचा. 🙏🙏🙏

जय हरी विठ्ठल !!!!!

डोक्यावर टोपी ......तर कधी फेटा  . ......स्वच्छ सफेद रंगाचा......
निर्मळ  मन.....त्याचं ..त्यात  वसलेला आहे विठ्ठल 
जिवाभावाचा.............

कपाळावर टिळा ....सुगंधी चंदनाचा. .....
मनात मात्र झरा वाहतोय विठ्ठलभक्तिचा.....

हातात मृदुंग ,चिपळ्या अन् टाळ. ...........
गळ्यात त्याच्या शोभते साधेपणाची माळ......

ज्ञानोबा -तुकोबांच्या अभंगात रमतं त्याचं मन ...... .
वीणाही बोलू लागते मग ......आणि ....
प्रत्येक कडव्यातून तो  तू करू लागतो देवाचं चिंतन. ... ...

देहभान हरपून तो किती सहज भक्तीरसात तल्लीन होऊन जातो.......
त्याचं त्यालाच कळत नाही कसा .......बेभान होऊन. ... तो..फुगडी घेऊ लागतो......

मनात असते ओढ माऊलीला भेटण्याची. ......
चरणस्पर्श करण्याची. ..........वेड्यासारखी......

अचानक मैलोनमैलांचा प्रवास त्याचा सोप्पा होतो...
चालून थकलेल्या पायांत कुणास ठाऊक कुठून बळ 
येतं.......

जीव कासावीस होतो क्षणोक्षणी........पण अधीर मनानं तो चालत राहतो........अनवाणी .......

चेहरा फुलतो आनंदाने ...जेव्हा इतक्या गर्दीतही  तो 
आपल्या विठूमाऊलीला बघतो.......
बघतच राहतो .......आनंदाश्रूंनी भरलेला चेहरा आणि. ........भक्तीरसात न्हाऊन निघालेलं सर्वांग घेऊन.............घबाड मिळाल्यासारखं. ..........

आत्ता जीव गेला तरी चालेल.....आत्ता माऊली भेटली.....तेच मायबाप .......असा विचार  करत परततो.........जड ....हळव्या मनानं. .........


जिव्हाळा त्यांच्यात मुरलेला असतो........
सेवाभाव त्याच्या रक्तातच असावा बहुतेक....
किती प्रामाणिक असतो ना आयुष्यात स्वतःच्या. ....

एवढं निस्वार्थ प्रेम तो करतो .....जगतो ......चंदनासारखं.......माऊलीच्या कपाळावरच्या....
एकरूप होतो त्या टिळ्यासारखा ......
खरा भक्त असतो ....त्या गोड वीणेसारखा..........
त्याच्यासारखा तोच ......आदर्श. ...असतो....
तो माऊलीच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेइतकाच गुणकारी.....पवित्र. ....सच्चा असतो....तो आपला वारकरी असतो..............


                  -कुणाल विजय ठाकरे. 


..




































टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट