मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

दिशाहीन मन........😍💛💚

दिशाहीन मन....💙 💙💙 चाललय कुठेतरी...बेभान होऊन. ....... वेगळ्याच दिशेला. ....निशब्द. ...चालत. .. वाट दिसेल तिकडे....... नाही माहिती काय होईल... कसं होईल. .....काय करावं....कुठे जावं... तरीही जायचं आहे एवढंच फक्त माहीती आहे.... अल्लड वाटतं बघितल्यावर. .. विचार आहेत प्रचंड भांबावलेले ... सतत काहीतरी सुचतय पण मार्ग मात्र अजूनही  सापडत नाही... एकाच ठिकाणी कधीकधी उभं राहतं तासनतास. .. पण मग पुन्हा काहीतरी विलक्षण शोधत बाहेर पडतं. सर्व काही आहे जवळ पण स्थिरताच नाही त्याला.  आनंद वाटतोय सहज मनमौजी वागायला.... जे काही करायच ते आत्ताच असंही वाटतय. सैरभैर होणं थोडं बदलावं हेही जाणवतय. . स्वतःला शोधण्यासाठी मन आसुसलय. . आत्ता भरकटलेपणालाही कुठेतरी काहीतरी अस्वस्थ  वाटतय.. पण वेळ मात्र थांबत नाही ... हे ही त्याला आत्ता कळून चुकलय. हळूहळू का होईना पण ध्येयाचं महत्त्व पटलय.. आत्ता खरं कुठेतरी दिशा सापडली असं वाटतय. चालायला खूपच आहे. माहिती आहे.पण आनंद आहे याचा कि दिशा मिळाली जगण्याला आत्ता मन नव्याने जगायला तयार आहे... कारण आत्ता आयुष्य आपोआपच सुंदर होणार आहे हो मनाला दिशा सापडली आहे...

आरसा..........😊😍😍😍



आरसा...........😍


तो..काहीतरी सांगत असतो गूढ .......
दररोज त्याच्यात  जेव्हा आपण बघतो....
तेव्हा तो किती प्रामाणिक वाटतो.......
आपलं  दिसणं  आपल्याला दाखवतो .........
जसंच्या तसं .....खरं.......
आपण माञ ...ज्याला सुंदर करत असतो सतत....
अस  दिसणं . .......किती क्षणिक असतं ......कदाचित तो...हे ही सांगत असतो .....नकळत. .........
आपण माञ आपल्यालाच बघून सुखावतो......त्याच्यात....

स्वतःला सजीव भासवतो माणूस.......पण मला तो आरसा  जिवंत वाटतो.....त्याच्यासारखाच .....
इतरांसाठी तो फक्त स्वतःचं रूपच दाखवत असतो....
मात्र स्वतःला शोधणारे त्या  आरशापलीकडेही बघत असतात......

 त्यांना तो त्यांचं असण सुधारायला मदत करतो ....
मित्र असल्यासारखा......
तो हसतो त्यांच्याबरोबर....
तो...रडतोपण...आवाज न करता.....
फक्त प्रतिबिंब नाही तो आपल्याला कधीकधी आपल्या आत डोकावायला भाग पाडतो......
कधी आपलीच नजर सुधारतो.........
तर कधी आपल्यासमोर आपलंच पितळ उघडं
पाडतो.....!
त्याला माहीती असतं आपण आपल्याशी नाही खोटं बोलू शकत .....कधीही.......
तो दाखवतो प्रतिबिंब आपलं...आपणही ते बघत असतो.......खूप काही सांगून जातं हे प्रतिबिंब. ....

कधी म्हणतं .......
तू स्वतःला महान समजतोस...
तर कधी रूबाबदार नजर दाखवून जातं..
तर कधी तुम्हाला जसे आहात ते किती सुंदर आहात हे सांगून जातं. .....
कधी स्वाभिमानाचं हसू  जाणवून देतं...
कधी आपण रडताना वाईट दिसतो हे सांगून जातं..
कधी गालावरच्या खळीला एक नवीन साज देतं...
कधी एखाद्याच्या रहस्याचा भाग बनून जातं.....

आपल्या  नकळत तो आरसा एक वस्तू न राहता.. 
एक दुवा बनून जातो......
आपल्या दिसण्या-असण्यातला........
बदलत्या वयातला आणि नजरेतला.....
जगावेगळा......काहीतरी शिकवून जाणारा.......
रहस्यमयी तितकाच साधा .......😊
आपला आरसा...........😍😍😍



                   -@कुणाल विजय ठाकरे. 




 








टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट