मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

दिशाहीन मन........😍💛💚

दिशाहीन मन....💙 💙💙 चाललय कुठेतरी...बेभान होऊन. ....... वेगळ्याच दिशेला. ....निशब्द. ...चालत. .. वाट दिसेल तिकडे....... नाही माहिती काय होईल... कसं होईल. .....काय करावं....कुठे जावं... तरीही जायचं आहे एवढंच फक्त माहीती आहे.... अल्लड वाटतं बघितल्यावर. .. विचार आहेत प्रचंड भांबावलेले ... सतत काहीतरी सुचतय पण मार्ग मात्र अजूनही  सापडत नाही... एकाच ठिकाणी कधीकधी उभं राहतं तासनतास. .. पण मग पुन्हा काहीतरी विलक्षण शोधत बाहेर पडतं. सर्व काही आहे जवळ पण स्थिरताच नाही त्याला.  आनंद वाटतोय सहज मनमौजी वागायला.... जे काही करायच ते आत्ताच असंही वाटतय. सैरभैर होणं थोडं बदलावं हेही जाणवतय. . स्वतःला शोधण्यासाठी मन आसुसलय. . आत्ता भरकटलेपणालाही कुठेतरी काहीतरी अस्वस्थ  वाटतय.. पण वेळ मात्र थांबत नाही ... हे ही त्याला आत्ता कळून चुकलय. हळूहळू का होईना पण ध्येयाचं महत्त्व पटलय.. आत्ता खरं कुठेतरी दिशा सापडली असं वाटतय. चालायला खूपच आहे. माहिती आहे.पण आनंद आहे याचा कि दिशा मिळाली जगण्याला आत्ता मन नव्याने जगायला तयार आहे... कारण आत्ता आयुष्य आपोआपच सुंदर होणार आहे हो मनाला दिशा सापडली आहे...

शब्दांची जादू...........✏✏✏✏

शब्दांची जादू. ..😍📒📑📝✏✏✏


शब्द.......... म्हंटलं  की आठवतो लेखक. ...त्यातला माणूस. ..कवी आणि हे जग त्यातली प्रत्येक गोष्ट. .........

शब्द. .....

पावसासारखे  बरसतात....कधी अंगावर शहारा आणतात भीतीचा ....प्रेमाचा...

शब्द रडवतात ढसाढसा.......तर कधी सहज हसू फुलवतात.....
शब्द ओरडतात, वाटतात  कर्कश  ............कधीकधी न मारता ओरखडा  करतात मनावर...नकळत..........

शब्द  कधीकधी हळुवार वाटतात ........मखमली फुलासारखे........

शब्द भाबडे असतात ......ते जळके .....अभिमानी सुद्धा असतात. ...
कधी तरी ते मनाचा ठाव घेतात ....
कधी प्रेमाची बरसात करतात...

कधी हेच शब्द बाळकडू ठरतात.....तर कधी मनात घर करून राहतात ........
शब्द नकळत अपमानही करतात.....तर कधी जखमेवर मीठ चोळतात....
शब्द देतात भांडणं लावून........
शब्द कधीकधी एखाद्याचा आधार  ठरतात...

शब्द कधीकधी जरा गरजेपेक्षा जास्त बोलले जातात........
काहीवेळा मात्र  कमीच वाटतात........

शब्द  दु:ख सांगतात.....शब्द यशाची कथा होतात...
शब्द सुचतात.....ते गुंफले जातात वाक्यात. ....

शब्द सतत पाठलाग करतात मनात......
शब्द मनमोकळं करतात.......
शब्द जिव्हारी लागतात....कधीकधी विष वाटतात....

शब्द  लिहतं करतात.......कवीमनाला.......
शब्द  वास्तव असतात ......शब्द इतिहासही जिवंत करतात....
शब्द  भाषांची ओळख बनतात.........

शब्द कधी बेअब्रू करतात .......तर कधी  अनेकांची तोंड बंद करतात....

शब्द नशिले असतात......शब्द तोलले जातात.....
शब्द शोधलेही जातात. .......
शब्द  पुसले ,खोडले जातात......बदलले जातात.....
तरीही ते निशब्द  असतात........


शब्द बेभान होतात. ....शब्द सुरीले वाटतात. ........
शब्द  ओठांवर येता येता. ..गायब होतात....!

शब्द जागे करतात...... .शब्द प्रेरणादायी ठरतात....
शब्द काही सेकंदात  सकारात्मकता पसरवतात....

शब्द इंद्रधनुष्यासारखे रंगीत वाटतात.......
शब्द कधी कधी प्रामाणिक होतात.......
तर कधी कपाळावर आठ्या आणतात. ..........
शब्द कधीकधी बोलके करतात ..
तर कधी. ...विचार करायला भाग पाडतात........

शब्द एकमेकांना दिलेही जातात........
कधी शब्द हे मालकीचेही असतात.......
शब्द हे कधी शिव्यांतून प्रकटतात........तर कधी नसानसांत आग लावतात........

शब्द लक्षात राहतात.......सांगितलेले......
शब्द विसरलेही जातात......शब्द काहींना  संपत्ती सारखे  वाटतात......
शब्द सतत मनात बहरत असतात वसंतासारखे.....
कधी हेच शब्द बालिश ,वेडे वाटतात....
तर कधी विचारांना वाट मोकळी करू देतात.......
नसतात कोणाच्या बंधनांत ते ...........सतत प्रत्येकात 
जीव ओतत असतात. .........

शब्दांची दुनियाच अतरंगी असते........
त्यांना कोणाची भीती नसते......
शब्द  सुटतात .....विरूनही जातात हवेत.......हेच शब्द कळत नकळत घडवतात हो .......आपल्याला ....... सहज..........सुंदर......


तुम्ही. ........आम्ही. .....आपण........सर्वच अपूर्ण आहोत शब्दांशिवाय..........
म्हणून जरा जपून वापरूया शब्द. ..........
त्यांना नव्याने जपूया ......जगूया......बोलूया ........फुलवूया......



                    -कुणाल विजय ठाकरे. 















टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट